निगडी ओटास्किम येथे टोळक्यांनी घरात घुसून एकाच्या डोक्या फोडली बाटली; घरातल्या समानाची केली तोडफोड

0
656

निगडी, दि. १२ (पीसीबी) – तिघे टोळके घरात घुसले. त्यांनी घरातील व्यक्तींना शिवीगाळ करुन घरातील सामानाची तोडफोड केली. त्यानंतर एकाच्या डोक्यात बीअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. ही घटना रविवार (दि.१०) रात्री उशीरा दिडच्या सुमारास निगडी ओटास्किम येथील दळवीनगर सेक्टर क्र.२२ गुरुदत्त हौसिंग सोसायटी येथील रुम नं. १०३ मध्ये घडली.

याप्रकरणी सुभाष कैलास सातव (वय २८, रा. रुम नं. १०३, गुरुदत्त हौसिंग सोसायटी, दळवीनगर सेक्टर क्र.२२, ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दादा गवळी, रघु आणि शेऱ्या नावाच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष हे त्यांची पत्नी दोन मुले आणि वडिलांसोबत राहतात. रविवार रात्री उशीरा दिडच्या सुमारास ते घरात झोपले असताना आरोपी दादा गवळी, रघु आणि शेऱ्या हे तिघे त्यांच्या घरात जबरदस्ती शिरले. आणि त्यांना लखन कुठे आहे अशी विचारणा केली. यावर सुभाष यांनी मला माहित नाही असे उत्तर देताच. आरोपींनी घरातील समानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावर सुभाष यांचे वडिल सामानाची तोडफोड करुन नका असे बोलल्याने आरोपी दादा गवळी याने त्याच्या हातातील बीअरची बाटली सुभाष याच्या वडिलांच्या डोक्यात मारुन जखमी केले आणि पसार झाले. याप्रकरणी दादा गवळी, रघु आणि शेऱ्या या तिघांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत अरदवाड तपास करत आहेत.