निगडीत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने ज्येष्ठ नागरिकावर ब्लेडने वार

0
471

निगडी, दि. ३ (पीसीबी) – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणाने जेष्ठ नागरिकावर ब्लेडने वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार (दि.२) दुपारी तीनच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली.

अभिमान बाबूराव घोलप (वय ६३, रा. इंद्रानगर, ओटास्कीम, निगडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष कांबळे (रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोलप हे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास किराणामाल खरेदी करून घराकडे निघाले होते. इंद्रानगर येथे आले असता संतोषने त्यांना अडविले. त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. घोलप यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग संतोष याला आला. त्याने घोलप यांच्या डाव्या हाताच्या बोटावर ब्लेडने वार केले आणि पसार झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.