माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; प्रकाश आंबेडकरांचा अंदाज

0
306

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात, असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी नसतील, आणि शरद पवार पंतप्रधानपदाच्या लायक नाहीत, असेही डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.