भाजपचे २३० खासदार निवडून आले तरी मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत – सुब्रमण्यम स्वामी

0
598

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – लोकसभेच्या २३० जागांवर भाजपचे खासदार निवडून आले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य करत भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना घरचा आहेर दिला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? असा प्रश्न स्वामी यांना मुलाखतीत विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर ३० ते ४० जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षांवर अवलंबून आहे. पण जर मित्रपक्षाने सांगितले की आम्हाला मोदी पंतप्रधान म्हणून पुन्हा नकोत तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत.

मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी यांचे नाव चर्चेत आहे. मोदींप्रमाणेच गडकरी देखील पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती आहेत, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. दरम्यान, मायावतींना आम्ही सोबत घेतले तरी त्यांनी अजून मोदींबाबतची भूमिका जाहिर केली नाही, असे सुब्रमण्यम स्वामींनी सांगितले आहे.