नाशिक फाटा येथे मेट्रोसाठी पिलरचे खड्डे खोदणारे ड्रिलिंग मशीन कोसळले

0
1132

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – नाशिक फाटा येथे मेट्रोसाठी पिलरचे खडडे खोदणारे ड्रिलिंग मशीन अचानक कोसळले. सुदैवाने यावेळी कोणतीही मोठी  दुर्घटना घडली नाही. मशीन उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ही घटना आज शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे, महामेट्रोच्यावतीने दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या पिलरच्या खड्डे ड्रिलिंग मशिनच्या सहाय्याने खोदण्याचे काम सुरू आहे. यावेळी ही मशीन अचानक कोसळली. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.

दरम्यान वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यास सुरूवात केली आहे.