नाशिकमध्ये विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकांना अटक आणि सुटका; विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट

0
529

नाशिक, दि. २० (पीसीबी) –  पंचवटी महाविद्यालयातील सचिन निशिकांत सोनवणे आणि प्रवीण दादाजी सूर्यवंशी या दोन प्राध्यापकांनी बारावीत उत्तीर्ण करण्यासाठी एका विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. यावर पीडित विद्यार्थिनीने या प्राध्यापकांविरुद्ध आडगाव पोलिसात तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी देखील तातडीने कारवाई करत सचिन आणि प्रवीण या दोघांना अटक केली.

आरोपी प्राध्यापकांना कोर्टात हजर केले असता दोघांना कोठडी सुनावली आणि त्यानंतर जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, संबंधित प्राध्यापकांच्या चौकशीसाठी पंचवटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून समिती नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराने विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. संबंधित प्राध्यापकांविरुद्ध संस्थेने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.