नाना पाटेकरांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची मागणी

0
642

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – अभिनेते  नाना पाटेकर यांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, अशी मागणी अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली आहे. तनुश्री दत्ताने आपल्या वकिलामार्फत ओशिवरा पोलिसांना अर्ज करुन ही मागणी केली आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर तनुश्रीने नाना पाटेकर यांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने पोलिसांना केलेल्या अर्जात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांचीही नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण काही दिवसांपूर्वी सांगितली होती. २००८ सालीहॉर्न ओके प्लीजचित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. ‘हॉर्न ओके..’ सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचे शूटिंग सुरु होते. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतले. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असा दावा तनुश्रीने केला.