नागपूरातून तालिबानी समर्थक अफगाणी तरुणाला अटक

0
215

नागपूर, दि. १७ (पीसीबी) : नागपूरमध्ये तालिबानी समर्थक असलेल्या अफगाणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. नूर मोहम्मद असं या 30 वर्षीय अफगाणी तरुणाचं नाव आहे. गेल्या 11 वर्षांपासून तो नागपुरात लपून राहत असल्याची माहिती आहे.

नूर मोहम्मद हा नागपूरमधील दिघोरी भागात छुप्या पद्धतीनं राहत होता. त्या तरुणाच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रण असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तालिबानी अतिरिक्यांना सोशल मीडियावर फॅालो करत असल्याने, त्याच्याभोवती संशय बळावला होता, त्यामुळे नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.

नागपुरात नूर मोहम्मदचे आणखी काही साथीदार आहेत का? याचा शोधही घेण्यात येत आहे. या अफगाणी नागरिकाला परत अफगाणिस्तानला पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

हा तरुण तालिबानी दहशतवाद्यांशी सतत संपर्कात होता की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच सोशल मीडियावर तो ज्या तालिबानी दहशतवाद्यांना फॉलो करत होता, त्यांच्याशी त्याचा काय संबंध आहे? याबाबतही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नांदेडमध्ये नेत्यांच्या हत्येचा कट, लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना कारावास
एनआयए विशेष न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 2012 मध्ये नांदेड येथून पाच जणांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतले. देशात अशांतता निर्माण करण्यासाठी नेते आणि पत्रकारांना ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी 2012 मध्ये अटक झालेल्या तीन जणांना मंगळवारी येथील विशेष एनआयए कोर्टाने शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी अन्य दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले

काय होता कट?
सौदीची राजधानी रियाद येथे नांदेड, हैदराबाद आणि बेंगळुरुसह भारतातील विविध भागांतील प्रमुख हिंदू नेते, पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची हत्या घडवण्याच्या उद्देशाने अकरमने आपल्या हँड्लरसह कट रचला होता, अशी माहिती एनआयएने दिली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली, असे एनआयएने कोर्टाला सांगितले.