“नवीन परप्रांतिय कामगार साईडवर कामास घेऊ नये” बांधकाम सेनेचे जयंत शिंदे यांच आवाहन

0
584
पिंपरी, दि,१७ (पीसीबी) – सध्या पुणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस शहारातील रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा धसका बाधकाम व्यवसायिक कामगारांना बसला आहे. नवीन परप्रांतिय कामगार साईडवर कामास घेऊ नये, जर कुणी कामगार गावाला अथवा दुसऱ्या शहरात जात असेल तर त्यांना सुध्दा काही दिवस प्रवास टाळायला सांगावे अश्या सुचना पुणे जिल्हा बांधकाम कामगार सेनेचे प्रमुख जयंत शिंदे यांनी दिल्या आहेत .
जयंत शिंदे म्हणाले,सध्या शहरामध्ये कोरोना या आजाराने थैमान मांडलेले असून दिवसेंदिवस शहरामधील रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या आजाराला प्रतिबंध घालायचा म्हटले तर या बाबतीत लोकांमध्ये योग्य असे मार्गदर्शन करावयाला प्रशासन कमी पडते आहे असे आम्हाला वाटते आज पर्यंत कुठल्याही बांधकाम प्रकल्पावर लेबर कॅम्प अथवा कामगार नाक्यावर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाहीये, असे जयंत शिंदे म्हणाले शिंदे यांनी यांनी घरांची पहाणी केली असता खर पाहता लेबर कॅम्पमध्ये राहणारे कामगार हे पत्त्याच्या जुनाट घरात राहतात. घरांच्या आजुबाजूला असलेले घाणीचे साम्राज्य, स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि स्वत:च्याच आरोग्याबाबत असलेली उदासिनता ही त्या कामगाराला मृत्युच्या दाढेपर्यंत कधी त्याला घेऊन जाते हे त्याला स्वत:ला देखील कळत नाही. बांधकाम कामगार सेना संघटना वेळोवेळी अशा कामगारासाठी सदैव झटत असते. कोरोना आजाराने एकही कामगार बळी पडणार नाही. यासाठी संघटना सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. असे बाधकाम कामगार सेनेचे प्रमुख जयंत शिंदे यांनी सांगितले आहे.
मोशी येथील बांधकाम प्रकल्प, लेबर कॅम्प व कामगार नाक्यावर कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना कोरोना आजाराविषयी व त्यावरील उपचार आणि आजाराला प्रतिबंध कसा घालता येईल याबाबत माहिती दिली.
तसेच नवीन परप्रांतिय कामगार साईडवर कामास घेऊ नये, जर कुणी कामगार गावाला अथवा दुसऱ्या शहरात जात असेल तर त्याला सुध्दा काही दिवस प्रवास टाळायला सांगावे असे आवाहन बांधकाम व्यवसायिक यांनी केले आहे.