नवले ब्रीजजवळ ट्रकचे ब्रेक फेल होऊन अपघात; तिघेजण गंभीर जखमी

0
562

पुणे, दि. ८ (पीसीबी) – साताऱ्याहून नारळ घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका ट्रकचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात दोन पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (सोमवार) दुपारी बाराच्या सुमारास नवले ब्रीज येथे घडली.

सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बाराच्या सुमारास साताऱ्याहून नारळ घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकचा नवले पुल व वडगाव पुलादरम्यानच्या ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले़ आणि त्याने १ दुचाकी, २ कार, २ रिक्षा आणि एक मिनी ट्रकचा जोरदार धडक दिली. या अपघातात दोन पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत़. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली़. जखमींना नवले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.