नागपूरमधील डीआरडीओमधून आयएसआयच्या एजंटला अटक; ब्राह्मोस क्षेपणास्त्राची माहिती आयएसआयला पुरवल्याचा संशय

0
465

नागपूर, दि. ८ (पीसीबी) – उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने नागपूरच्या डीआरडीओच्या यूनिटमधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक केली आहे. अटक केलेली व्यक्ती ही ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती विभागात काम करत होती.

निशांत अग्रवाल असे या संशयित गुप्तहेराचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अग्रवालने आयएसआयला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्त कारवाई करत ही अटक केली. निशांत मागील ४ वर्षांपासून नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमध्ये कार्यरत आहे. डीआरडीओचे हे यूनिट बुटीबोरी परिसरात आहे. नागपूरला येण्यापूर्वी तो हैदराबाद येथे कार्यरत होता, असे सांगण्यात येते. आज पहाटेपासून ही कारवाई करण्यात येत होती. निशांतने डीआरडीओशी संबंधित माहिती पुरवल्याचा आरोप आहे. निशांतने विशेषत: ब्राह्मोसची माहिती आयएसआयला दिल्याचा संशय आहे.