नवनित राणा याना स्पॉंडेलिलिल, अनिल देशमुख यांना खांदेदुखी , नवाब मलिक यांना मुत्राशयाचा त्रास

0
293

– जेलमध्ये असलेल्या राजकिय नेत्यांच्या आजारपणामुळे पोलिस अधिकारी टेन्शनमध्ये

मुंबई, दि. २ (पीसीबी) : वेगवेगळ्या आरोपांखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा, माजी मंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक यांना आजारांचा सामना करावा लागत आहे. तिघांनाही यासंदर्भात केलेल्या अर्जामुळं ही माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांच्या वकिलांनी भायखळा जेलच्या अधीक्षकांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. हीच तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पाठवली आहे. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनी कोर्टात अर्ज केला आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या नेत्यांना विविध आजार असल्याचे त्यांच्या वकिलांनी उघड केले असून आता शेवटचा पर्याय म्हणून आजाराचे कारण पुढे करुन सवलती मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

नवनीत राणा यांच्या वकिलांचं अधीक्षकांना पत्र
नवनीत राणा यांच्या वकिलांनी तक्रार भायखळा जेलच्या अधीक्षकांना यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसची समस्या आहे. जेलमध्ये सतत फरशीवर बसल्यानं आणि झोपण्यामुळं ही समस्या वाढत आहे. यामुळं नवनीत राणा यांना 27 एप्रिल रोजी जेजे रुग्णालयात घेऊन गेले. जेजेमधील डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं होतं. मात्र ते अजून केलेलं नाही. त्यांना गंभीर दुखण्याने ग्रासलं आहे. सीटी स्कॅन न केल्यानं उपचार काय करायचं हे ठरवू शकत नाही. आम्ही संबंधित यंत्रणेला अर्ज दिला मात्र त्यावर विचार केला गेला नाही. जर त्यांची प्रकृती बिघडली तर त्याला जबाबदार आपण असाल असंही आम्ही सांगितलं आहे, असं पत्रात म्हटलं आहे. हीच तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पाठवली आहे.

खाजगी उपचारासाठी अनिल देशमुखांनी कोर्टाकडे मागितली परवानगी
जेजे रुग्णालयात उपचारासाठीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांनी कोर्टाकडे परवानगी मागितली. जेजे हॉस्पिटलकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ असं कोर्टानं म्हटलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात आपल्या आजारांबद्दल स्वतः न्यायाधीशांना माहिती दिली. अनिल देशमुख यांना खांदेदुखी असून हृदयविकाराची समस्या असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. अनिल देशमुखांच्यावतीनं घरचे जेवण मिळावं म्हणून कोर्टाकडे अर्ज दाखल करण्यात आला. खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात ईडीनं उत्तर देण्यास वेळ मागितला आहे. मात्र घरच्या जेवणासाठी ईडीचा विरोध नाही. कोर्टानं याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं ईडीनं म्हटलं. अनिल देशमुख यांच्या दोन्ही अर्जांवर 4 मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाईल. अनिल देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जेजे रुग्णालयाला मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्ज
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात आज ईडीतर्फे 2.30 वाजता उत्तर दाखल करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांच्या मुत्राशयाच्या विकारावर तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागितली आहे. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर हा जामीन अर्ज दाखल केला आहे.