नरेंद्र मोदींनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिली; काँग्रेसचा आरोप

0
293

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या निवडणूक अर्जात गुजरातच्या गांधीनगरमधील एका भूखंडाबाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोप लावला आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने याप्रकणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी असे म्हटले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी दावा केला आहे की, मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक भूखंड घेतला होता, आणि त्याबद्दल त्यांनी 2007 आणि 2012 च्या विधानसभा निवडणूकीत आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात चुकिची माहिती देली आहे. काँग्रेसच्या या आरोपांवर सध्या भाजपकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.

खेरा म्हणाले ‘‘सुप्रीम कोर्टात सोमवारी एक जनहीत याचीका दाखल केली आहे. यात पंतप्रधान नेरंद्र मोदींच्या संपत्तीबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे, कारण त्यांनी याबाबत चुकीची माहिती दिली आहे. मोदी मुख्यमंत्री बननल्यानंतर ही जमीन घेण्यात आली. 2007 त्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी गांधीनगरच्या सेक्टर -1 मध्ये एक भूखंड असल्याचा उल्लेख आपल्या निवडणूक अर्जात केला, ज्याचे क्षेत्रफळ त्यांनी 326.22 मीटर असल्याचे सांगितली. याची किंमत 1.3 लाख रूपये असल्याची माहिती मिळाली. बाजार भावानुसार त्याची किमंत आता 1.2 कोटी रूपये आहे.”

ते पुढे म्हणाले की, ‘‘2012 च्या विधानसभा निलडणुकीत त्यांनी भूखंड संख्या 411 चा उल्लेख आपल्या अर्जात केला नाही. त्यांनी दुसरे भूखंड 401/ए चा उल्लेख करताना म्हणाले की, ते याची मालक आहे. याचे क्षेत्रफळ 326.22 वर्गमीटर सांगितले. त्यासोबत पंतप्रधानांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतदेखील भुंखड 411 चा उल्लेख केला नाही, तर 401/ए चा उल्लेख केला. त्यांनतर त्यांनी आपल्या वेबसाइटवर आपल्या संपत्तीची घोषणा केली, त्यात 401/ए भुखंडाचा उल्लेख करताना म्हटले की, ते याचे एक चतुर्थांश मालक आहेत. त्यामुळे आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी कठोर कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.