पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर वस्त्र्याने वार

0
397

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचत असताना एकाने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणाच्या मानेवर वस्त्र्याने वार केले. तसेच त्याच्या दोन मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.१४) रात्री दहाच्या सुमारास पिंपरी मेन बाजार येथील गणेश हॉटेलजवळ घडली.