नगरसेवक राहुलभाऊ भोसले युवा मंच व पंचशील महिला बचत गट यांच्यावतीने कोरोना योद्धाचा सन्मान

0
585

चिंचवड, दि.०२ (पीसीबी) : विठ्ठल नगर मधील कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले युवा मंच व पंचशील महिला बचत गट यांच्या वतीने 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून नेहरूनगर मधील माजी महापौर हनुमंतराव भोसले दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया ताई शिंदे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल व कोरोणा काळात केलेल्या अतुलनीय समाजसेवेचे बद्दल सन्मान करण्यात आला,यावेळी दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्याप्रतीही बांधिलकी व्यक्त करत त्यांचाही सन्मान करण्यात आला,यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शमाभाभी शेख,हनुमंत चौगुले,सुनिता पाटोळे,स्नेहलता पाटोळे,महादेव आडसुळे,न्यानोबा धावारे,छोटू शेख,मंगल राजगुडे उपस्थित होते.

“या सत्कारचे सर्व योगदान मी माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांना देते,कोरोना काळात त्यांनी वेळेची पर्वा न करता राष्ट्रकार्य केले.” असे प्रतिपादन डॉ.छायाताई शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मिरा वाघमारे,अशोक देवकर,किशोर गवळी,संजय जाधव,दत्ता जाधव,बापू सावंत,विनोद गायकवाड,रवी मांजळकर,संजय जोगदंड यांनी परिश्रम घेतले.