धोनीला स्पष्ट सांगावे की पुन्हा संधी मिळणार नाही; माजी खेळाडूचा निवड समितीला सल्ला

0
416

मुंबई, दि, १९ (पीसीबी) – सध्या क्रिकेय वर्तुळात एकच चर्चा बघायला मिळत आहे की, महेंद्र सिंग धोनी निवृत्त कधि होणार आहे. यावर निवड समितीने धोनीशी चर्चा करुन त्याला स्पष्टपणे सांगावे की यापुढे संधी मिळणार नाही, असा सल्ला भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने निवड समितीला दिला आहे.

विश्वचषक संपल्यानंतर धोनीच्या निवृतीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. यावरच विरेेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती कधी घ्यावी याचा निर्णय घेण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. त्याने कधी निवृत्त व्हायचे हा त्याचा प्रश्न आहे, असे सेहवागने म्हटले आहे. मात्र निवड समितीने धोनीला सांगितले पाहिजे की यापुढे संधी देऊ शकत नाही. ते निवड समितीचे काम आहे, असे सेहवागने म्हटले आहे.