मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी सर्व यंत्रणा सज्ज – चंद्रकांत पाटील

0
368

तुळजापूर, दि, १९ (पीसीबी) – मराठवाड्याकडे पाऊसाने यावर्षी सद्धा पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते काल तुळजापूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते..

दरम्यान, पाटील यांच्याकडून हा दावा केला जात असला तरीही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारकडे राजूशासनाकडून परवानग्या मागितल्या आहेत. या परवानग्या ३० तारखेपूर्वी मिळण्याची शक्यता आहे. परवानगी मिळताच कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे, अशी माहिती स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर दिली आहे . त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आणखी प्रतीक्षा पहावी लागणार आहे.