धुळ्यात १ मार्चला राहुल गांधींची जाहीर सभा

757

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे धुळे येथे १ मार्चला आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  यावेळी काँग्रेस मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.  

त्याचबरोबर काँग्रेसकडून पुढील महिन्यात महाराष्ट्रात प्रियंका गांधी यांच्या रॅलीचेही आयोजन येणार आहे. त्यानंतर येत्या २० मार्च रोजी नांदेड येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त प्रचारसभा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे सहभागी होणार आहेत.

दरम्यान,  धुळ्यात राहुल गांधी यांच्या सभेसाठी नियोजन सुरू  आहे. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.