दोन तरुणांमधील प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या युवा सेना प्रमुखाचा खुन

0
575

सांगली, दि. १८ (पीसीबी) – दोन तरुणांमध्ये एका तरुणीला प्रपोज करण्याच्या कारणावरुन वाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी मद्यस्ती गेलेल्या एका युवा सेना प्रमुखाचा बाप लेकाने चाकुने वार करुन खून केला. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर जाधववाडी या गावात घडली.  

याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिता-पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ भोसले आणि प्रमोद भगत यांच्यात एका मुलीला प्रपोज केल्याच्या कारणावरून शुक्रवारी जाधववाडी येथे वाद सुरू होता. याची माहिती प्रमोदचा मित्र व खानापूर युवा सेना प्रमुख आकाश भगत याला मिळाली. हा वाद मिटवण्यासाठी आकाश भगत, विपुल जाधव व त्याचे मित्र जाधववाडी येथे पोहोचले होते. यावेळी दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. आकाश भगत व विपुल जाधव यांच्यावर आदिनाथ भोसले, त्याचे वडील यांनी अन्य एकाच्या मदतीने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात आकाश भगत आणि विपुल जाधव हे गंभीर जखमी झाले. आकाशचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  घटनेनंतर केवळ १२ तासात विटा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या संयुक्त पथकाने हल्लेखोर पिता-पुत्रासहा तिघांना अटक केली आहे.