धक्कादायक; सिल्लोडमध्ये घरात घुसून महिलेला पेटवले

0
365

औरंगाबाद, दि.५ (पीसीबी) – एका महिलेला घरात घुसून पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. हि घटना औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील  अंधारी  गावात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या प्रकरणातील आरोपीविरोधात जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष मोहिते  असे या आरोपीचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मोहिते हा गावात बिअर बार चालवतो. त्याने रविवारी रात्री पीडित महिलेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घरात घुसण्यापासून रोखल्यामुळे त्याने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. पीडित महिला ९५ टक्के भाजली असून तिच्यावर ‘घाटी’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी संतोष मोहितेला पोलिसांनी अटक केली आहे. मोहितेवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.