शरद पवारांकडे सरकारचा रिमोट कंट्रोल नाही – उद्धव ठाकरे

0
648

मुंबई,दि.५(पीसीबी) – “रिमोट कंट्रोल वगैरे असा काही प्रश्न नाहीये. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. शरद पवार रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते सामनाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल नाही. ते सरकारचे मार्गदर्शक आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. त्यांच्या काही सूचना असतील तर ते त्या जरूर करतात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.