धक्कादायक: दारुड्या मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून आईनेच केला खून

0
1038

उस्मानाबाद, दि. ३ (पीसीबी) – दारु पिऊन त्रास देणाऱ्या मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून आईनेच त्याचा खून केल्याची धक्कादाय घटना समोर आली. ही घटना मंगळवार (दि.२) उस्मानाबाद येथील समुद्रवाणी येथे घडली.

राम महादेव कावळे (वय ३५, रा. समुद्रवाणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बेंबळी पोलिसांनी आई हिरकणाबाई कावळे यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाने टेलर असलेल्या रामला दारूचे व्यसन होते. व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी दोन्ही मुलांसह काही महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली होती. राम आणि त्याची आई हिरकणाबाई दोघेच घरी राहत होते. रामचे दोन्ही मोठे भाऊ कुंडलीक आणि बालाजी शेजारीच विभक्त राहत आहेत. राम गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन आईसोबत वाद घालत होता. यामुळे कंटाळलेल्या आईने सोमवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास दारु पिऊन झोपलेल्या राम याच्या डोक्या कुऱ्हाडीचे घाव घालून त्याचा खून केला. मध्यरात्री दीड वाजता मृताच्या भावाला त्याची किंकाळी ऐकू आली होती. मात्र, खून करणाऱ्या आईने त्याला “काही नाही झोप’, असे सांगून प्रकार दडवण्याचा प्रयत्न केला. खुन करुन हिरकणाबाई आपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. याबाबत संशय आल्याने नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. घरात पाहिले असता तेथे राम याचा मृतदेह आढळून आला. यानंतर काही तासातच हिरकणाबाई यांना अटक करण्यात आली.