धक्कादायक: डांगे चौकात कामावर निघालेल्या रिसेप्शनिस्ट तरुणीवर चाकूने सपासप वार

0
620

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – डांगे चौकात दिवसाढवळ्या एका तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

गौरी विठ्ठल माळी (वय, २०, रा. डांगे चौक) असे चाकूचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी विकास शांताराम शेटे (वय २१, रा. वाडा, खेड) या तरुणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी गौरी ही डांगे चौकातील स्पंदन रुग्णालयात ‘रिसेप्शनिस्ट’ म्हणून कामाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. यावेळी तेथे दबाधरुन बसलेल्या आरोपी विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या घटनेत गौरी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी विकासला अटक केली आहे.  वाकड पोलिस तपास करत आहेत.