धक्कादायक: गुडनाईटचे लिक्विड पिऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
505

लातूर, दि. ७ (पीसीबी) –  फेसबुक लाईव्ह करत एका तरुणीने गुडनाईटचे लिक्विड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना लातूरच्या औसा रोड परिसरात घडली. मात्र तातडीने तरुणीला रुग्णालयात दाखल केल्याने ती बचावली.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने रात्री दोनच्या सुमारास फेसबुक लाईव्हवर गुडनाईट लिक्विड पिऊन आत्महत्या करत असल्याचे सांगत होती. हा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी तरुणीचे घर गाठले. मात्र त्याआधीच लिक्विड प्यायल्याने पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही तरुणी पँथर सेनेची पदाधिकारी होती. मात्र राजीनामा दिल्यानंतरही काही लोक त्रास देत होते. यामुळे चिडून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न केला.