दोन हजारांचे बील न भरल्याने पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील फोन बंद

0
798

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – मोठ्या अडचणीतून आणि कष्टाने सुरु झालेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या आयुक्तालयात कर्मचारी, वाहने, जागा, या सारख्या गोष्टींचा अभाव आहे. तरी सुध्दा या अडचणींवर मात करुन आयुक्तालयाचे काम काही प्रमाणात सुरळीत सुरु आहे.

आयुक्तांनी एका अडचणीवर मात केल्यास लगेचच दुसरी अडचण समोर येते. १५ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या आयुक्तालयात कागद पेन आणण्यापासून कामाला सुरुवात झाली. ‘एक आहे तर दुसरे नाही आणि दुसरे आहे तर तिसरे नाही’ यामुळे आयुक्तांसह पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. बुधवारी चिखली पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी आपल्या अडचणींचा पाढा पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर आज खूद पोलीस आयुक्तांचाच लॅन्ड लाईन फोन बंद पडल्याने त्यांच्या बद्दल नागरिकांमधून नाराजीचा सुर समोर येत आहे. या सर्व गोष्टी अतिघाई केल्याने होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.