देशात गोडसेची औलाद जिवंत मला कधीही गोळ्या घालतील – खासदार ओवैसी

0
486

दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – देशात अजूनही गोडसेची औलाद जिवंत आहे. म्हणून मलाही एक दिवशी गोळ्या घातल्या जातील, अशी भिती ‘एमआयएम’चे खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

केंद्र सरकारचा काश्मीरमधील जमिनीवर डोळा असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. काश्मीरमध्ये सध्या अघोषित आणीबाणी आहे. त्याठिकाणी फोन सुरु नाहीत किंवा लोकांना बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य नाही, असेही ओवैसी म्हणाले तसेच जे मला अँटी नॅशनल म्हणतात ते स्वत: देश विरोधी आहेत, अशीही टिका त्यांनी केली.