देशातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा

0
473

मुंबई, दि, ३० (पीसीबी) – दिल्ली  पावसाशी संबंधित घटनांमध्ये शनिवारी देशभरात २२ जण ठार आणि सात जण जखमी झाले. त्यामध्ये महाराष्ट्र व झारखंडमधील मृतांचा समावेश आहे. दरम्यान, गुजरातच्या दक्षिणेसह, नवी दिल्ली येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे जम्मू भागात उष्णतेची लाट असून शनिवारी पारा ४३.१ अंशांवर स्थिरावला होता. 

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुजरातमधील वळसाड, नवसारी, डांग, सुरत, नर्मदा, छोटा उधेपूर आणि बडोदे या जिल्ह्यांत पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मेघालय, छत्तीसगड, केरळ, कर्नाटकातील काही भाग, अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश आणि गोवा येथेही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ओडिसामध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  उत्तर प्रदेशातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, परंतु काही भागांत उन्हाच्या झळा होत्या.  दरम्यान, देशातील काही भागांत उष्णतेची लाट असून, अमृतसरमध्ये ४२.४ अंश सेल्सियस, तर अंबालामध्ये ४१.८ अंश सेल्सयस तापमान नोंदविण्यात आले. उथ्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये ४४ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले.