नीता अंबानींच्या ‘या’ हँडबॅगेची किंमत माहीत आहे का?

0
481

मुंबई, दि, ३० (पीसीबी) – रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी  यांची एक हँडबँग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही हँडबॅग व्हायरल होण्याचे कारण आहे तिची किंमत. जगातील सर्वात महागड्या बॅगा तयार करणारी कंपनी हर्म्सने अंबानी यांची ही हिमालय बर्किन हँडबॅग तयार केली आहे. या बॅगेची किंमत आहे ३ लाख डॉलर्स, म्हणजेच सुमारे २ कोटी ६ लाख रुपये इतकी. 

होय, हे खरे आहे… तुम्ही वाचतायत ते वास्तव असून या बॅगेची किंमत दोन कोटींहून अधिक आहे. ही बॅग मगरीच्या कातड्यापासून तयार करण्यात आलीय आणि हे या बॅगेचे एक वैशिट्य समजले जाते. या बॅगेला एक-दोन नव्हे, तर चक्क २४० हिरे बसवण्यात आले आहेत. या बॅगेचे हार्डवेअर १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले आहे.