देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करतील -नितीन गडकरी

0
599

मुंबई ,दि.२३(पीसीबी) -महाराष्ट्राच्या राजकारणात आज प्रचंड उलथापालथ झाली.आज सकाळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवलं.

यासर्व घडामोडींनंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपण काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली. तसेच नव्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला शुभेच्छा दिल्या.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले , मी आधीच म्हणालो होतो कि क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते. काही दिवसांपूर्वी मी बोललो होतो ‘ राजकारण आणि क्रिकेट ‘ यात काहीही अशक्य नाही. ते खरं ठरलं , राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले ते स्थिर सरकार असेल . हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा मला विश्वास आहे , माझ्या नवीन सरकारला शुभेच्छा , असे गडकरी म्हणाले.