मोदी है तो मुमकीन है.- देवेंद्र फडणवीस

0
513

मुंबई ,दि.२३(पीसीबी) -महाराष्ट्रात आज राजकीय भूकंप झाला. आज सकाळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवलं.

फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदीजी है तो मुमकीन है… असे म्हणत केंद्र सरकारच्या पुढाकारानेच ही खेळी यशस्वी ठरल्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी, अपक्ष आणि समर्थन देणाऱ्या सर्वच अपक्ष आमदारांचे आभार मानले आहेत. आपली बांधिलकी ही महाराष्ट्रातील जनतेशी आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या समर्थनातून स्थिर सरकार दिलंय. मोदी है तो मुमकिन है.. असे म्हणत फडणवीस यांनी मोदींचेही आभार मानले.