देवेंद्र फडणवीस, तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या; पाहुयात ते मुलाखत देतात का – संजय राऊत

0
195

मुंबई,दि.१३(पीसीबी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर करताना, ” देवेंद्र फडणवीस, तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्यावी, पाहुयात ते मुलाखत देतात का” असं आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

तुमचीही वृत्तपत्रं आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाख घ्यावी आणि मुलाखत छापण्याची हिंमत दाखवावी असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी सामना हे आधी शिवसेनेचं मुखपत्र होतं आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंही मुखपत्र झाल्याचं म्हटलं आहे. या टीकेवर संजय राऊत यांनी उत्तर दिलंय, सामना हे लोकांचं वृत्तपत्र आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावर टीका करतान फडणवीस यांनी ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग किंवा नुरा कुस्तीसारखी आहे अशी टीका केली. मॅच फिक्सिंग एकदा संपूद्या मी त्यावर नक्की प्रतिक्रिया देईन असंही ते म्हणाले होते. एवढंच नाही तर करोनाच्या काळात राजकारण केलं जातं आहे. सरकार पाडायचा प्रयत्न होतो आहे असंही संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही फडणवीस यांनी टीका केली. स्वतःच मारुन घ्यायचं आणि स्वतःच रडायचं ही नवी पद्धत आहे. कोणीही सरकार पाडत नाही तरीही यांचा कांगावा सुरु आहे असंही फडणवीस म्हणाले होते. या सगळ्या टीकेला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं.