देवाच्या मूर्त्यांना पॉलिश करण पडल महागात.. पहा कस ते…

0
442

तळेगाव दाभडे, दि.7 (पीसीबी) : देवाच्या मूर्त्यांना पॉलिश करण्यासाठी पावडर आणली असून मुर्त्या घेऊन या पॉलिश करून देतो, असे म्हणत घरात आलेल्या दोन चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील 90 हजारांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी मावळ तालुक्यातील चांदखेड येथे घडली.

याबाबत 22 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची सासू अशा दोघीजणी सोमवारी दुपारी घरात होत्या. दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास एका दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या घरात आले.

‘देवांच्या मूर्तीला पॉलिश करण्याची पावडर आणली आहे. तुम्ही घरातून देवांच्या मुर्त्या घेऊन या तुम्हाला पॉलिश करून देतो’, असे म्हणत एका व्यक्तीने फिर्यादी यांच्या गळ्यातील 90 हजारांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने तोडून ओढून दुचाकीवरून दोघेही पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.