देवदर्शनाला आल्यानंतर देवाकडे काही मागत नाही – पंतप्रधान मोदी

0
610

डेहराडून, दि. १९ (पीसीबी) – देवदर्शनाला आल्यानंतर मी देवाकडे काही मागत नाही. देवाकडे काही मागण्यावर माझा विश्वास नाही. देवाने आपली निर्मिती देण्यासाठी केली आहे, मागण्यासाठी नाही,  असे केदारनाथमध्ये रात्रभर गुहेत ध्यानधारणा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले.   

मोदी पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली. आध्यात्मिक क्षेत्राला जाण्याची संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी कामे सुरु आहेत.  येथे काम करण्याची संधी कमी मिळते. येथील विकासकामांवर माझे कायम लक्ष असते.

दरम्यान, केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या  मोदी यांनी आज ( रविवारी ) सकाळी  पत्रकारांशी संवाद साधला.  जवळपास १७ ते १८ तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केल्यानंतर मोदींनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली.  मोदी आज  बद्रिनाथलाही भेट देणार आहेत.