पुणे-लोणावळा मार्गावर ब्लॉक; तीन लोकल रद्द

0
572

पुणे, दि. १९ (पीसीबी) – कान्हे ते वडगाव स्टेशन दरम्यान तांत्रिक कामासाठी आज (रविवार) पुणे-लोणावळा मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

या ब्लॉकमुळे पुण्याहून लोवणाळ्यासाठी जाणाऱ्या तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुपारी १२.१५, दुपारी एक आणि दुपारी तीन वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, लोणाळ्याहून दुपारी २.५०, दुपारी ३. ४० आणि सायंकाळी ५.१५ वाजता पुण्याकडे येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सकाळी सव्वाअकरा वाजताची पुणे-लोणावळा लोकल तळेगावपर्यंतच धावणार आहे. तर, दुपारी २.१९ वाजताची लोणावळा-पुणे लोकल तळेगाव येथून पुण्याकडे रवाना होणार आहे. तसेच पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौंड मनमाड या मार्गे धावणार आहे.