दूध भाववाढीच्या धमक्या देऊ नका; अशा इशाऱ्यांना घाबरत नाही- रामदास कदम

0
711

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – दूध भाववाढीच्या धमक्या देऊ नये, अशा इशाऱ्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात दूध उत्पादक आंदोलन करतील, असा इशारा खासगी दूध उत्पादकांनी दिल्यानतंर कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

कदम यावेळी म्हणाले की, खाजगी दूध विक्रेत्यांना सरकारने योजना दिली आहे. अर्धा लिटर दुधावर ५० पैसे, एक लुटर वर १ रूपया डिपाॅजीट घेतले पाहिजे, असा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय आपल्या भावी पिढीसाठी आहे, असेही कदम म्हणाले. दुधभाव वाढ होणार नाही, मी येत्या मंगळवारी दूध उत्पादकांची बैठक बोलावली आहे, असे कदम यांनी यावेळी सांगितले.

प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात दूध उत्पादक आंदोलन करतील, असाही इशारा खासगी दूध उत्पादकांनी दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील खासगी दूध उत्पादक विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, या संघर्षात ग्राहक होरपळून निघतील, अशीही भीती व्यक्त होत आहे.