दुर्देवी: घरावर झाड कोसळल्याने दोघा चिमुकल्यांसह आईचा मृत्यू

0
534

बुलडाणा, दि. २३ (पीसीबी) – वादळी पावसादरम्यान पत्र्याच्या घरावर भलेमोठे झाड कोसळल्याने दोघा चिमुकल्या मुलासह त्यांच्या आईचा दुर्देवी मृत्यू झाला. ही ह्दयद्रावक घटना शनिवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील घाटपुरीत घडली. घरावर कोसळलेले झाड क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात आल्यानंतर तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

शारदा गुणवंत हिरडकर (वय २८), सृष्टी गुणवंत हिरडकर (वय ३) आणि ऋषिकेश गुणवंत हिरडकर (वय २) असे मयत तिघा मायलेकांची नावे आहेत.

शनिवारी रात्रीच्या सुमारास घाटपुरी परिसारत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यादरम्यान लींबाचे भले मोठे झाड हे पत्र्याच्या घरात राहणाऱ्या हिरडकर कुटुंबाच्या घरावर कोसळे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी घाव घेत घरावर पडलेले झाड क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले. झाडाखाली दबलेले आई, मुलगी आणि मुलाला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुणवंत हिरडकर हे हॉटेल व्यवसायिक असल्याने ते कामावर होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.