दुपारच्या वेळी घरात घुसून महिलेचा विनयभंग

0
256

आळंदी, दि. २८ (पीसीबी) – दुपारी घरात झोपलेल्या महिलेच्या घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना 16 मार्च रोजी दुपारी पावणे तीन वाजता मरकळ येथे घडली.

दिलीप बबन भंडारे (रा. वढू बुद्रुक. ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची मुलगी 16 मार्च रोजी दुपारी त्यांच्या घरी झोपल्या होत्या. दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने घरात येऊन घराचा दरवाजा बंद केला. त्यावेळी फिर्यादी लाईट लावण्यासाठी जात असताना आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ‘कोणास काही सांगितले तर तुझ्याकडे बघून घेईन’ अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.