आकुर्डीतील स्थापत्यविषयक कामे मार्गी लावा

0
382

आकुर्डी, दि. २८ (पीसीबी) – आकुर्डी भागात विद्युत, स्थापत्य ,ड्रेनेज विषयक विविध कामे कामे प्रलंबित आहेत. ही कामे तत्काळ मार्गी लावण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी महापालिकेकडे केली आहे.याबाबत सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ट्रिनिटी शाळेजवळ खड्डा पडला असून त्याठिकाणी पेविंग ब्लॉक्स रिफिक्सिंग करावे. इंद्रप्रस्त सोसायटी क्रांतीनगर येथे सार्वजनिक जागेत पेविंग ब्लॉक्स खचले असून पादचाऱ्यांना येता जाता त्रास होत आहे. विवेकनगर येथे जैन स्थानक येथे रस्त्याच्या बाजूला 3 आठवडे झाले खोदून ठेवले असून अद्यापही ब्लॉक्स बसवले नाहीत. तसेच जैन स्थानक समोर मनोज जैन यांच्या बंगल्या शेजारी पावसाचे पाणी जाण्याकरिता पाईप टाकली आहे. ती चुकीच्या पद्धतीने टाकली असून पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, पाणी आत बंगल्यामध्ये शिरत आहे.

आकुर्डी मेन रोडवर सिमेंट क्रॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असून भालेराव हॉस्पिटल समोर एक लाईन झाली नाही. 10 फूट खड्डा सुमारे 6 महिन्यापासून तसाच आहे. श्री विठ्ठल मंदिर बाजूला विठ्ठल हेरिटेज जवळ ड्रेनेज लाईन दुरुस्त करून 5 महिने झाले. अद्याप पेव्हिंग ब्लॉक्स रिफिक्सिंग केलेले नाहीत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. अमृत योजने अंतर्गत नाल्यामधील ड्रेनेज लाईन बदलली असून सदर काम झाल्यानंतर नाल्या शेजारी असणाऱ्या जयश्री अपार्टमेंट मध्ये पावसाळ्यात पाणी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या उर्दू शाळेसमोर कदम चाळीत नवीन ड्रेनेज लाईन टाकावी, अशा विविध मागण्या सय्यद यांनी निवेदनातून केल्या आहेत.