दुचाकी चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

0
193

वाकड, दि. ४ (पीसीबी) – वाकड मधील 16 नंबर बस स्टॉप येथे पार्क केलेली दुचाकी दोन चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 मे रोजी रात्री सात ते साडेसात वाजता कालावधीत घडली.

सुनील उर्फ दाद्या मोहन शिंदे (वय 30), राजेंद्र उर्फ फकाट लक्ष्मण पारधे (वय 22, दोघे रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. याबाबत प्रमोदकुमार रामप्रकाश त्यागी (वय 34, रा. पंचशीलनगर, पिंपळे निलख) यांनी शनिवारी (दि. 3) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यागी यांनी त्यांची चाळीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एम एच 14 / जी बी 6553) 27 मे रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास वाकड येथील 16 नंबर बस स्टॉप जवळ पार्क केली. अर्ध्या तासाच्या कालावधीत चोरट्यांनी दुचाकीचे लाॅक तोडून दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.