‘…आणि वर्कशॉपजवळ ठेवलेले लाखोंचे साहित्य एका रात्रीत झाले गायब’

0
405

पिंपळे गुरव, दि. ४ (पीसीबी) – वर्कशॉपच्या गोडाऊन समोर ठेवलेले एक लाख 85 हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्यावेळी चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 3) सकाळी निसर्ग कॉलनी, पिंपळे गुरव येथे उघडकीस आला.

मनीषा दिगंबर गोवंडे (वय 58, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपळे गुरव मध्ये टॅलेंट इंजिनियर्स अँड ट्रेडर्स नावाचे वर्कशॉप आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ऑफिस बंद करून घरी जात असताना वर्कशॉप समोर ठेवलेले साहित्य शनिवारी सकाळी आढळून आले नाही. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी 70 हजार रुपये किमतीच्या दोन निडल्स, 50 हजार रुपये किमतीच्या पाच रिपेरिंग नीडल, एक पिकप ट्राॅली, स्टील बेअरिंग असा एकूण एक लाख 85 हजार यांचा माल चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.