‘गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण नाहीतर सोडचिठ्ठी दे’; विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल

0
228

देहूगाव, दि. ४ (पीसीबी) – ‘आई-वडिलांकडून आम्हाला गाडी घेण्यासाठी 50 हजार रुपये घेऊन ये. नाहीतर आम्हाला सोडचिट्टी दे.’ असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देहूगाव येथे घडली.

पती दुर्गेश भालेराव, सासु संगीता भालेराव, सासरे सुरेश मारुती भालेराव, नणंद सुषमा उत्तम भालेराव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत .याबाबत पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तू तुझ्या आई-वडिलांकडून आम्हाला गाडी घेण्यासाठी 50 हजार रुपये घेऊन ये. नाहीतर आम्हाला सोडचिट्टी दे व दुर्गेशला एकदाच मोकळे कर.’ असे वारंवार बोलून आरोपींनी पीडित विवाहितेला शिवीगाळ केली. तसेच पती दुर्गेश याने देखील विवाहितेला याच कारणावरून वारंवार हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.