दिवसाढवळ्या कंपनी समोरील गाडी गेली चोरीला आणि नंतर…

0
229

चाकण, दि.३ (पीसीबी): कंपनीच्या समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) दुपारी अडीच ते रात्री अकरा वाजताच्या सुमारास निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गेट समोर घडली.

अक्षय मारुती नेवाळे (वय 29, रा. नेवाळी वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मध्ये काम करतात. शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी कंपनीच्या गेट समोर पार्क केली. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. रात्री कामावरून अकरा वाजताच्या सुमारास परत आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत