दिघी, शिवसाईनगर येथे घरासमोरील दोन दुचाकी जाळल्या

0
935

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकी दोघा जणांनी जाळल्या. ही घटना बुधवारी (दि.६) पहाटे दिघीतील शिवसाईनगर  येथे घडली. या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

ज्ञानेश्वर उत्तम गुजर (वय ३३), हरीश तुकाराम साबळे (दोघे रा. सावंतनगर, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मण माणिक शिंदे (वय २८, रा. शिवसाईनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  लक्ष्मण शिंदे यांनी त्यांच्या मालकीच्या दोन दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केल्या होत्या. दोघा आरोपींनी  दोन्ही दुचाकी जाळून टाकल्या. यात एकूण ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.