दारु पिण्यासाठी न गेल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक वार

0
539

निगडी, दि. १९ (पीसीबी) – दारू पिण्यासाठी न गेल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक वार करण्यात आले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.१८) रात्री साडेदहाच्या सुमारास निगडी येथे घडली.

अतुल दिगंबर कसबे (वय २८, रा. राजनगर ओटास्किम, निगडी) असे चाकूचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोन्या धरणे (पूर्ण नाव माहित नाही. रा. ओटास्कीम, निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कसबे हे जेवण झाल्यानंतर ओटास्किम परिसरात पायी फिरत होते. यावेळी आरोपी सोन्या याने कसबे यांना दारू प्यायला चल असे म्हणत जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कसबे यांनी जाण्यास नकार दिला. यावर चिडलेल्या सोन्याने खिशातून चाकू काढून कसबे यांच्यावर प्राणघात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.  निगडी पोलीस तपास करत आहेत.