शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

0
961

पुणे, दि. १९ (पीसीबी) – ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने नुकताच  माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा  पार पडला.  महाविद्यालयाने दोन वर्षापूर्वीच  आपला रौप्यमहोत्सव साजरा केला आणि संस्थेनेदेखील दोन वर्षांपूर्वीच शतक महोत्सव साजरा केला.. या ऐतिहासिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाने ध्वजाची पताका फडकावणाऱ्या महाविद्यालयाचे आपण माजी विद्यार्थी आहोत, याचा सार्थ अभिमान उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

महाविद्यालयाच्या १९९६ साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां पासून सर्व माजी विद्यार्थ्यांना या स्नेहमेळाव्यासाठी निमंत्रित केले होते. सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली. अनेक विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनंतर परस्परांना भेटत होते. त्या काळातील  शिक्षक , कर्मचारी , क्लासरूम , प्रयोगशाळा बघून मुले खूपच नॉस्टॅल्जिक झाली. हे सर्व विद्यार्थी आज देशात आणि परदेशात अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत. कित्येक जणांचे स्वतःचे उद्योग व्यवसाय आहेत.

यावेळी बोलताना स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एस बोरमने म्हणाले  की, महाविद्यालय आणि  स्नेह मेळावा होणे खूप गरजेचे आहे. आपण सर्व माजी विद्यार्थी महाविद्यालयाची ‘शान’ आहात कारण आपल्या मुळेच संस्थेचे नाव जगभर पोचत असते.

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संस्थेला  सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले . व्यासपीठावर प्राचार्यांच्या समवेत माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव मयंक जजोदिया , समन्वयक डॉ उत्तम आवारी , प्रशासकीय अधिकारी ए बी भोंसले,  सर्व  विभाग प्रमुख  उपस्थित होते.  कार्यक्रमाला शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी   हजर होते.