दारुड्या मुलाने आईचा वस्तऱ्याने गळा कापून केला निर्घृण खून

0
866

नांदेड, दि. ३० (पीसीबी) – दारुच्या आहारी गेलेल्या एका दारुड्या मुलाने स्वत:च्या आईचा वस्तऱ्याने गळा कापून निर्घृण खून केला. ही घटना लोहा तालुक्यातील हिप्परगा येथे बुधवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास घडली.

शांताबाई यादव कोंडामंगले (वय ७०) असे खून झालेल्या वृध्द आईचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा पांडुरंग यादव कोंडामंगले याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिप्परगा येथे पांडुरंगचे हेअर कटिंग सलूनचे दुकान आहे. पांडुरंग दारूच्या आहारी गेला होता यामुळे शांताबाई आणि पांडुरंगमध्ये वारंवार वाद होत होते. बुधवारी सायंकाळी पांडुरंगची पत्नी माहेरी गेली असल्याने तो आणि आई शांताबाईच घरी होते. त्यामुळे शांताबाई त्याला दारू पिऊन आल्यानंतर टोकत असे. काम धंदा कर, दुकान चांगले चालव, रोज दारू कशाला पितो असे म्हणत असल्याने त्याला शांताबाईचा राग आला. त्याने घरातील वस्तरा घेऊन शांताबाईच्या गळ्यावर वार केले. यामध्ये शांताबाई यांचा मृत्यू झाला. पांडुरंग याला अटक करण्यात आली आहे. लोहा पोलीस अधिक तपास करत आहेत.