दादर फुल मार्केटमध्ये तरुणावर गोळीबार करुन खून

0
554

दादर, दि. १२ (पीसीबी) – दादर फुल मार्केटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार करुन त्याची हत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

मनोज मौर्या (वय ३५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी मनोज मौर्या या तरुणावर गोळीबार करत खून केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. दादर फुल मार्केट गजबजलेला परिसर असून अशा ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, मनोज मौर्य फुल मार्केटमध्ये वजनकाठा पुरवण्याचे काम करत होते. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी गोळीबार झालेला परिसर सील केला असून सध्या तपास सुरु आहे.