पंधरा हजारांची लाच घेताना कारागृह अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
672

चंद्रपूर, दि. १२ (पीसीबी) –  चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांना १५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या (लाचलुचपत विभाग) अधिकाऱ्यांनी शासकीय निवासस्थानातून रंगेहात अटक केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हा कारागृहात एक आरोपी काही दिवसांपासून जेरबंद होता. काही कारणाने या आरोपीची मुदतपूर्व सुटका झाली. सुटका झालेल्या आरोपीच्या शोधार्थ तक्रारकर्ते कारागृहात पोहचले. बँकेचे समन्स बजावण्यासाठी तक्रारदाराला हा पत्ता आवश्यक होता. यासाठी २५ हजार रुपयांची मागणी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी केली. मात्र १५ हजार रुपयात सौदा पक्का झाला.

कारागृह परिसरात असलेल्या ढोले यांच्या निवासस्थानी तक्रारदार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पंचासह पोहचले. १५ हजार रुपयांची लाच घेताना ढोले यांना शासकीय निवासस्थानातून एसीबीने रंगेहाथ अटक केली. एसीबीने भाईदास ढोले यांच्या कारागृह कार्यालय, निवास आणि मूळ गावी देखील शोधमोहीम सुरु केली आहे.