दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला व्हीआयपी वागणूक; पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

0
445

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला विशेष वागणूक देणाऱ्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. इकबाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.