दलितांच्या केवळ दोन पिढ्यांनाच आरक्षण देण्यात यावे – भाजप खासदार

0
1061

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – दलितांच्या फक्त दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सी पी ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर  सवर्णांनाही आर्थिक आधारवर आरक्षण देण्यात यावे, अशी  मागणी  केली.

देशभरात सवर्णांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. केंद्र सरकारने त्यांच्यासाठी तात्काळ पावले उचलली नाहीत तर देशात नवीन समस्या उभी राहू शकते, असे ते म्हणाले. दलित आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण  देण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वीही ठाकूर यांनी दलित आरक्षणाला विरोध करून आरक्षणच संपुष्टात आणले पाहिजे, असे मत व्यक्त् केले होते.

जर एखादी व्यक्ती आरक्षित कोट्यातून राज्याचा सचिव झाला. तर त्याच्या कुटुंबीयांना आरक्षणासाठी मागास समजले जावे का ?  समजा एक जात ५० वर्षांपासून मागास आहे आणि त्यातील एक वर्ग क्रिमीलेअरमध्ये आलेला असेल. तर अशा परिस्थितीत काय केले पाहिजे?, असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला.